`२६ जुलै दिवस आठवला की काटा उभा राहतो`

Last Updated: Friday, July 26, 2013, 11:03

जोरदार पाऊस पडला की मुंबईत पाणी साचणं हे मुंबईकरांसाठी नवीन नाही.. मात्र त्या दिवशी भूतो न भविष्यती पाऊस पडला आणि सतत धावणा-या मुंबईकरांच्या लाईफला जणू ब्रेक लागला. आम्ही बोलतोय, २६ जुलै २००५ विषयी. या प्रलयकारी दिवसाला आज ८ वर्ष पूर्ण होतायत.

राज्यात पावसाचा तडाखा, अतिवृष्टीचा इशारा

Last Updated: Monday, September 3, 2012, 19:18

दुष्काळाच्या झळांनी होरपळत असलेल्या मराठवाड्यावर वरुणराजा प्रसन्न झालाय. मराठवाड्यात आज पहिल्यांदाच जोरदार पाऊस झाला. औरंगाबाद, बीड, परभणी आणि उस्मानाबाद परिसरात पावसानं जोरदार हजेरी लावली. कोकणातही चांगला पाऊस झाला आहे. येत्या २४ तासात हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

मुंबईत जोरदार पाऊस, रेल्वेवर परिणाम

Last Updated: Monday, September 3, 2012, 18:45

मुंबई आणि परिसरात जोरदार पाऊस कोसळतोय. पश्चिम उपनगरांमध्येही संततधार सुरू आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारं तानसा धरण भरून वाहू लागलंय. सकाळपासूनच कोसळत असलेल्या सरींमुळे अनेक ठिकाणी पाणी साचलंय. तसंच मध्य रेल्वेच्या वाहतुकीवरही परिणाम झालाय.