`२६ जुलै दिवस आठवला की काटा उभा राहतो`, July 26, 2005, A strong rain and flood in Mumbai

`२६ जुलै दिवस आठवला की काटा उभा राहतो`

`२६ जुलै दिवस आठवला की काटा उभा राहतो`
www.24taas.com,झी मीडिया, मुंबई

जोरदार पाऊस पडला की मुंबईत पाणी साचणं हे मुंबईकरांसाठी नवीन नाही. मात्र त्या दिवशी भूतो न भविष्यती पाऊस पडला आणि सतत धावणा-या मुंबईकरांच्या लाईफला जणू ब्रेक लागला.. आम्ही बोलतोय, २६ जुलै २००५ विषयी. या प्रलयकारी दिवसाला आज ८ वर्ष पूर्ण होतायत.

न विसरता येणारा भीषण दिवस. त्या प्रलयंकारी पावसाच्या आठवणींना आठ वर्ष होत असताना आजही आपण सुरक्षित नसल्याचीच भावना प्रत्येकाच्या मनात कायम आहे. याला जबाबदार आहे तो प्रशासनाचा धीमा आणि भोंगळ कारभार! २६ जुलैच्या प्रलयात तब्बल १४९३ जणांचे बळी गेले आणि ४५० कोटींचे नुकसान झाले. त्यानंतर मिठीच्या मगरमिठीतून बाहेर पडण्यासाठी आजवर सुमारे २५०० कोटी खर्च झाले आहेत. तरी आजही मुंबईत पाणी तुंबत आहे. याचा त्रास मुंबईकरांना सहन करावा लागत आहे.

मुंबईतील २६ जुलैच्या महापुराला कारणीभूत ठरलेल्या मिठी नदीच्या विकासासाठी राज्य सरकारने ‘मिठी नदी संरक्षण व विकास प्राधिकरणा’ची स्थापना केली. १७.८ कि.मी. लांबीच्या मिठी नदीपैकी ११.८ कि.मी. लांबीची नदी महापालिकेच्या अखत्यारीत आहे. मात्र, कामाला गती मिळालेली नाही. त्यामुळे पुन्हा सातत्याने आठवडाभर पाऊस पडला तर २६ जुलैच्या आठवणी ताज्या होतील, अशी भीती मुंबईकर व्यक्त करतात.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Friday, July 26, 2013, 11:03


comments powered by Disqus