इस्टर्न हायवे जाम, प्रवाशांचे मेगाहाल

Last Updated: Wednesday, April 18, 2012, 14:10

मध्य आणि हार्बरची रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने याचा ताण रस्तेवाहतुकीवर पडला आहे. इस्टर्न हायवेवर वाहनांची गर्दी वाढलेली दिसून येत आहे. वाहतुकीची सेवा सुरळीत नसल्याने प्रवाशांचे मेगाहाल झाले आहेत. त्यातच वाहतुकीची कोंडी झाल्याने ट्रॅफीक जामचा सामना करावा लागत आहे. प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून बेस्टने १३४ मार्गांवर जादा बस सोडल्या आहेत.

तिकीटाची दरवाढ, रेल्वे प्रवास महागणार...

Last Updated: Friday, November 18, 2011, 03:50

गेली काही वर्ष भाडेवाढीपासून दूर असलेल्या रेल्वेनेही यंदा भाडेवाढ होण्याचे संकेत दिले आहेत. महागाईने त्रासलेल्या जनतेला आता रेल्वेच्या भाडेवाढीलाही सामोरं जावं लागणार आहे. भाडेवाढीचा प्रस्ताव तयार असल्याची माहिती रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांनी दिली.

'सुहाना सफर'? महिलांना मात्र गरगर

Last Updated: Tuesday, November 15, 2011, 12:16

एका नव्या शोधानुसार असे समजते की दररोज प्रवास करणाऱ्या महिला ह्या सतत चिडखोर बनतात.लंडन स्कूल ऑफ इकनॉमिक्सच्या संशोधकांनी असे जाणले आहे की रोज रोज प्रवास करणाऱ्या महिलांच्या मानसिक स्वास्थावर वाईट परिणाम घडून येतो.