Last Updated: Saturday, October 6, 2012, 18:05
किंगफिशरच्या सुमारे चार हजार कर्मचाऱ्यांना गेल्या सहा महिन्यांपासून पगार मिळालेला नाही. सध्याच्या घडीला किंगफिशर एअरलाईन्सच्या नुकसानाचा आकडा तब्बल 8 हजार कोटी इतका आहे. तर विविध बँकांनी दिलेल्या कर्जाचा बोजा 7 हजार कोटींचा आहे. किंगफिशरच्या ताफ्यात असलेल्या 63 विमानांपैकी आता फक्त दहाच विमानं उरली आहेत.