अखेरच्या रणजी मॅचमध्ये `मास्टर ब्लास्टर`चा धमाका

Last Updated: Tuesday, October 29, 2013, 18:55

हरयाणाविरूद्ध लाहली येथे सुरू असलेल्या रणजी मॅचमध्ये मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने हाफ सेंच्युरी झळकावत मुंबईच्या विजयाच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. अखेरच्या रणजी मॅचमध्ये हाफ सेंच्युरी झळकावणाऱ्या मास्टर ब्लास्टरच्या या फॉर्ममुळे विंडिजविरूद्ध टेस्ट करताही त्याचा होमवर्क पूर्ण झाल्याचं दिसून आलं.

महाशतकः क्रिकेटचा दिवाळी, दसरा, पाडवा साजरा

Last Updated: Friday, March 16, 2012, 17:36

टॉस जिंकून प्रथम बॅटींगसाठी आलेल्या इंडियन टीमची सुरवात म्हणावी तशी चांगली झाली नाही. गंभीर जो गेल्या मॅचचा हिरो ठरला होता, तो या मॅचमध्ये जास्त चमकदार कामगिरी करु शकला नाही.

माझ्या कारकिर्दीतील सर्वश्रेष्ठ विजय- धोनी

Last Updated: Tuesday, February 28, 2012, 19:54

भारताने श्रीलंकेविरुद्ध मिळविला ऐतिहासिक विजय हा माझ्या कर्णधाराच्या कारर्किदीतील सर्वश्रेष्ठ विजय असल्याचे मत टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने व्यक्त केले आहे. भारताने होबार्ट वन डे मध्ये श्रीलंकेचा सात गडी आणि ८६ चेंडून राखून दणदणीत पराभव केला. भारताने श्रीलंकेचे ३२१ धावांचे आव्हान ३६ षटक आणि ४ चेंडूत पार केले.

भारताने 'बोनस गुणासह जिंकून दाखवलं'

Last Updated: Tuesday, February 28, 2012, 16:56

आज भारताची शेवटची वनडे श्रीलंकेसोबत सुरू आहे. होबार्ट वन-डेत भारताने टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. लंकेविरूद्ध महत्त्वाच्या मॅचकरता टीम इंडियामध्ये झहिर खान परतला असून, इरफान पठाणला दुखापतीमुळे विश्रांती देण्यात आली आहे.

टीम इंडियाचा पाय 'खोलात'

Last Updated: Tuesday, February 14, 2012, 17:16

भारत २३६ रनचा पाठलाग करताना ४ विकेट गमवल्या असल्या तरी गंभीरने मात्र आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. गेल्या सामन्यात त्यांचे शतक काही होऊ शकले नव्हते.

विराटचे अर्धशतक साजरे

Last Updated: Wednesday, February 8, 2012, 18:03

भारत आणि श्रीलंका यांच्यामधील दुसऱ्या वनडे मॅचमध्ये इंडिया हळूहळू विजयाकडे कूचकरीत आहे. सचिन 48 रनवर आऊट झाल्यानंतर त्यानंतर आलेल्या रोहित शर्माने फक्त 10 रनची भर घालून परतीची वाट धरली. त्याला परेराने दिलशान करवी कॅचआऊट केले.

सचिन आऊट, विराटचे अर्धशतक

Last Updated: Thursday, January 26, 2012, 10:28

अॅडलेड टेस्टच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाने पुन्हा नांगी टाकली. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने पुन्हा निराशा केली आहे. तो २५ रन्सवर आऊट झाला. ऑस्ट्रेलियाच्या ६०४ रन्सचा पाठलाग करताना टीम इंडियाची दमछाक झाली आहे. १४५ रन्सवर ५ विकेट गेल्या आहेत.

हस्सीचं अर्धशतक साजरं....

Last Updated: Wednesday, January 4, 2012, 15:25

सिडनी टेस्ट मध्ये पॉन्टिंगने शतक आणि क्लार्कने द्विशतक ठोकल्यानंतर आता माइक हस्साने देखील आपलं अर्धशतक झळकावलं आहे. फक्त ८६ बॉलचा सामना करत ५१ रन्स्ची दमदार खेळी केली आहे. सध्या ऑस्ट्रेलियाने भारतासमोर धावांचा डोंगर उभा केला आहे, आतापर्यंत २८२ रन्सचा लीड ऑसी टीमने घेतला आहे.