धुळ्यात गारपीटग्रस्त दोन शेतकऱ्यांची आत्महत्या

Last Updated: Wednesday, March 12, 2014, 21:01

गारपिटीचा कहर आता बळीराजाच्या जीवावर उठलाय. धुळे जिल्हात दोन गारपीटग्रस्त शेतक-यांनी आत्महत्या केली आहे. चैल गावातील चैताराम कुवर आणि कापडणे गावातील सतीश पाटील या दोन शेतक-यांनी आत्महत्या केली आहे.

शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसू नका - राज ठाकरे

Last Updated: Wednesday, March 12, 2014, 20:49

राज्य आणि केंद्र सरकारने नेहमीप्रमाणे शेतक-यांच्या तोंडाला पानं न पुसता गारपीटग्रस्तांना तात्काळ मदत करावी, अशी मागणी राज ठाकरे यांनी केलीय. राज यांनी संकटग्रस्त कुटुंबाला 1 लाख रूपयांची मदत केली.

राज ठाकरेंनी हात जोडले, म्हणाले धीर धरा!

Last Updated: Wednesday, March 12, 2014, 18:47

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आजपासून गारपिटीग्रस्तांच्या व्यस्था जाणून घेण्यासाठी मराठवाडा दौऱ्यावर आहेत. राज यांनी शेतकऱ्यांना हात जोडून विनंती केलेय. तुम्ही हिंमत धरा, बाकी मी बघतो, असा धीर देत शेतकऱ्यांना आवाहन केले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करा, अशी मागणी राज यांनी यावेळी केली.