Last Updated: Wednesday, March 12, 2014, 18:47
www.24taas.com, झी मीडिया, लातूर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आजपासून गारपिटीग्रस्तांच्या व्यस्था जाणून घेण्यासाठी मराठवाडा दौऱ्यावर आहेत. राज यांनी शेतकऱ्यांना हात जोडून विनंती केलेय. तुम्ही हिंमत धरा, बाकी मी बघतो, असा धीर देत शेतकऱ्यांना आवाहन केले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करा, अशी मागणी राज यांनी यावेळी केली.
गारपीट आणि अवकाळी पावसामुळे मराठवाड्यात शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागातील शेतकर्यांना दिलासा देण्यासाठी आज राज ठाकरे हे लातूर, बीड आणि औरंगाबाद जिल्ह्याच्या दौर्यावर आहेत. त्यांनी लातूर जिल्ह्यातल्या मसलगा शिवारात गारपीटग्रस्त शेतकर्यांची भेट घेतली. यावेळी शेतकऱ्यांना धीर देत हिंमत हरू नका, धीर धरा. बाकीचे मी बघतो, असे सांगत त्यांनी शेतकऱ्यांचे दु:ख कमी करण्याचा प्रयत्न करीत धीर दिला. आपण शेतकऱ्यांचे विजबील माफ करण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी भेट घेणार असल्याचे राज यांनी स्पष्ट केले.
शेतकर्यांनो तुम्ही कोणतेही चुकीचे पाऊल उचलू नका. धीर धरा. हिंमत हरू नका, अशा शब्दात राज ठाकरे यांनी शेतकर्यांना आवाहन करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांनी राज यांनी चर्चा केली आणि नुकसानग्रस्त भागांची पाहाणी केली. राज ठाकरे लातूर, बीड आणि औरंगाबाद असा दौरा करत आहेत.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, March 12, 2014, 15:47