आमिर खान पंतप्रधानांच्या भेटीला

Last Updated: Monday, July 16, 2012, 10:09

प्रसिद्ध अभिनेता आमिर खान आज पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेणार आहे. आमिर यावेळी डोक्यावर मैला वाहून नेणाऱ्यांच्या समस्येवर चर्चा करणार आहे. आरोग्याचा हा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, अशी आमिरची मागणी आहे.