आमिर खान पंतप्रधानांच्या भेटीला - Marathi News 24taas.com

आमिर खान पंतप्रधानांच्या भेटीला

www.24taas.com, मुंबई
 
प्रसिद्ध अभिनेता आमिर खान आज पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेणार आहे. आमिर यावेळी डोक्यावर मैला वाहून  नेणाऱ्यांच्या समस्येवर चर्चा करणार आहे. आरोग्याचा हा गंभीर प्रश्न सोडविण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, अशी आमिरची मागणी आहे.
 
आमिर खानने आपल्या `सत्यमेव जयते` या कार्यक्रमातून या प्रश्नावर प्रकाश टाकला.  डोक्यावरून मैला वाहून  नेणे आरोग्यासाठी धोकादायक आहे. तसेच रेल्वे रूळावरच शौच टाकले जात असल्याने पर्यावरणाबरोबरच रेल्वे प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर रूप धारण करेल. गेली कित्येक वर्ष हा प्रश्न सोडविण्यात आलेला नाही. त्यामुळे याची माहिती आपण याभेटीतून पंतप्रधानांना देणार आहे. हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघावा यासाठी हा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले.
 
देशात 300, 000 लोक डोक्यावरू मैला वाहून नेत आहेत. तसेच देशातील अन्य सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी पंतप्रधानांनी लक्ष घालावे, यासाठी आमिर प्रयत्न करीत आहे. त्यासाठी भेट असल्याचे सांगण्यात आले.

First Published: Monday, July 16, 2012, 10:09


comments powered by Disqus