Last Updated: Tuesday, August 27, 2013, 12:42
मुंबईत महिला फोटोग्राफर गँगरेप प्रकरणी अटकेत असलेल्या एका आरोपीनं आपल्या आईसमोर आपल्या कू-कर्माची कबुली दिली. २१ वर्षीय कासिम शेख याला रविवारी नायर हॉस्पिटलच्या बाहेरून अटक करण्यात आली होती. सोमवारी त्याच्या आईनं त्याची भेट घेतल्यानंतर तो ढसढसा रडला आणि म्हटला, `होय! मी त्या मुलीशी चुकीचं वागलोयं...`