चार महिन्यांपासून १३ वर्षीय मुलीवर सतत बलात्कार

Last Updated: Tuesday, March 18, 2014, 11:41

मुंबईतील परळ भागात एका १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर मागील चार महिन्यांपासून बलात्कार होत असल्याची घटना उघडकीस आलीय. भीतीपोटी या मुलीनं आपल्यावरील अत्याचाराबाबत मौन बाळगलं होतं. मात्र काल ज्यावेळी घरच्यांना याबाबत माहिती दिल्यानंतर तिच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.