Last Updated: Tuesday, March 18, 2014, 11:41
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईमुंबईतील परळ भागात एका १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर मागील चार महिन्यांपासून बलात्कार होत असल्याची घटना उघडकीस आलीय. भीतीपोटी या मुलीनं आपल्यावरील अत्याचाराबाबत मौन बाळगलं होतं. मात्र काल ज्यावेळी घरच्यांना याबाबत माहिती दिल्यानंतर तिच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
या घृणास्पद कृत्यासाठी किडवई पोलिसांनी सुनील आणि भुल्लर नावाच्या दोघांना अटक केलीय. आरोपींना आज कोर्टात हजर केलं जाणार आहे.
मुंबईत वारंवार अशा घटना घडतायेत. त्यामुळं पुन्हा एका मुंबईत महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो
करा.पाहा व्हिडिओ
First Published: Tuesday, March 18, 2014, 11:33