अशी ही नियती: तीन मित्रांचा अशाप्रकारे मृत्यू

Last Updated: Tuesday, June 3, 2014, 17:56

गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनामुळं महाराष्ट्राचं मोठं नुकसान तर झालंय, पण मराठवाडा पोरका झालाय... आधी प्रमोद महाजन, मग विलासराव देशमुख आणि आता गोपीनाथ मुंडे... एकमेकांचे चांगले मित्र असलेल्या मराठवाड्याच्या या तिन्ही सुपुत्रांनी अचानक एक्झिट घेतल्यानं, हळहळ व्यक्त केली जातेय...

मुंडेंनी स्वीकारला परम मित्रानं सांभाळलेल्या मंत्रालयाचा पदभार

Last Updated: Wednesday, May 28, 2014, 21:08

देशाच्या तिजोरीतून सर्वाधिक निधी संरक्षण मंत्रालयावर खर्च होतो. त्यानंतर क्रमांक येतो तो ग्रामविकास मंत्रालयाचा. तब्बल 77 हजार कोटींचं बजेट असलेल्या या खात्याची सूत्रं खासदार गोपीनाथ मुंडे यांनी मंगळवारी स्वीकारली. विशेष म्हणजे मुंडे यांचे परममित्र असलेले विलासराव देशमुख यांनीही अल्प कालावधीसाठी हे मंत्रालय सांभाळलं होतं.

राष्ट्रवादीकडून जयंत पाटलांना लोकसभेची उमेदवारी!

Last Updated: Saturday, December 28, 2013, 20:41

हातकंणगले लोकसभा मतदारसंघातून गरज पडल्यास ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांना उमेदवारी दिली जावू शकते, अशी घोषणा प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव यांनी केलीय. ते सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

बायो टॉयलेटला 'बापू' म्हणा - जयराम रमेश

Last Updated: Tuesday, June 26, 2012, 17:00

अग्नीसारख्या क्षेपणास्त्रापेक्षा देशाला जास्त गरज आहे ती शौचालयांची, असं म्हटलंय केंद्रीय ग्रामविकास मंत्री जयराम रमेश यांनी. बरोबरच या ‘बायो टॉयलेटस्’ला ‘बापूं’चं नाव देण्यात यावं अशीही मागणी त्यांनी केलीय. आणि दोन्ही वाक्यांवर त्यांना तोंडावर पडायची वेळ आलीय.