वेगळ्या विदर्भासाठी थेट जंतरमंतरवर...

Last Updated: Monday, August 5, 2013, 10:28

वेगळ्या विदर्भाची मागणी थेट सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी नागपूरमधील सुमारे ५०० ते ७०० आंदोलनकर्ते थेट दिल्लीत दाखल झालेत. जंतरमंतरवर एकत्र येऊन ते वेगळ्या विदर्भाची आज मागणी करणार आहेत.

अण्णा म्हणाले, 'टीम अण्णा संपली'

Last Updated: Monday, August 6, 2012, 14:42

टीम अण्णांची कोअर कमिटी बरखास्त करण्यात आली आहे. कोअर कमिटीचा कार्यकाळ संपल्याची घोषणा अण्णांनी आपल्या ब्लॉगवर केली आहे. आपण राजकीय पक्षाची स्थापना करणार नसल्याचंही अण्णांनी आपल्या ब्लॉगवर स्पष्ट केलं आहे.

आता आरपारची लढाई - अण्णा हजारे

Last Updated: Friday, August 3, 2012, 18:27

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचा उपोषण सोडण्याचा निर्णय आणि राजकारणात उडी घेण्याची केलेली घोषणा यामुळे आंदोलनाचे वातवरणच पलटून गेले आहे. अण्णांचा हा निर्णय नव्या पर्वाची सुरुवात की जुन्या पर्वाचा शेवट? याबाबत उत्सुकता शिगेला पोहली होती. जंतरमंतरवर लाखोंच्या उपस्थित अण्णा हजारे यांनी आता आरपारची लढाई, असल्याचे म्हटले आहे. त्यानंतर एकच जलोष पाहायला मिळाला.

आत्महत्या नाही तर बलिदान - केजरीवाल

Last Updated: Wednesday, August 1, 2012, 16:39

गेल्या आठवड्यापासून म्हणजेच 26 जुलैपासून टीम अण्णा सदस्य उपोषणाला बसले आहेत. अण्णा हजारे हजारे या उपोषणात पाचव्या दिवसापासून सहभागी झाले असले तरी टीम अण्णा सदस्यांच्या उपोषणाचा आजचा सातवा दिवस आहे. या आंदोलनाची धुरा सांभाळणाऱ्या अरविंद केजरीवाल यांना अशक्तपणा जाणवू लागलाय.

टीम अण्णांच्या आंदोलनात बाबांचं 'जंतरमंतर'

Last Updated: Friday, July 27, 2012, 16:42

आज टीम अण्णांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस. काही प्रमाणात थंड पडलेल्या या आंदोलनाला रामदेव बाबांनी ‘जंतरमंतर’वर हजेरी लावून ऊर्जा मिळवून दिली.

जनतेच्या हितासाठी राजकारणात - अण्णा हजारे

Last Updated: Friday, July 27, 2012, 12:17

जनता म्हणत असेल तर राजकारणाचा विचार केला जाईल. याबाबत माझी काही हरकत नाही, असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी एका न्यूज चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

टीम अण्णांच्या आंदोलनाचा पहिला दिवस

Last Updated: Thursday, July 26, 2012, 08:25

प्रभावी लोकपाल विधेयक आणि १४ मंत्र्यांविरोधात कारवाई या मागणीसाठी टीम अण्णानं जंतर-मंतरवर बेमुदत उपोषण सुरू केलंय. सरकारनं दरवेळी फसवणूक केल्याचा आरोप करत, यावेळी मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषणावरून हटणार नसल्याचा इरादा टीम अण्णानं व्यक्त केलाय.

अण्णा दिल्लीकडे रवाना

Last Updated: Tuesday, July 24, 2012, 16:02

भ्रष्टाचाराच्या मुद्यावर टीम अण्णा पुन्हा आक्रमक झालीय. उद्यापासून टीम अण्णांचं जंतरमंतरवरच्या नियोजित आंदोलनाला सुरूवात होणार आहे. यासाठी आज सकाळीच अण्णा दिल्लीकडे रवाना झालेत.

अण्णा हजारेंचा एल्गार, सरकार मूकबधीर आहे

Last Updated: Sunday, March 25, 2012, 11:45

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी सक्षम लोकपाल बिलासाठी पुन्हा एल्गार पुकारला आहे. केंद्रातलं सरकार हे मूकबधिर आणि संवेदनाहीन असल्याचा घणाघात अण्णांनी केला आहे. जंतरमंतरवर जाण्याआधी अण्णांनी राजघाटवर महात्मा गांधींच्या समाधीचं दर्शन घेतलं.

जंतरमंतरवर अण्णा धरणार धरणं

Last Updated: Monday, November 28, 2011, 08:22

हिवाळी अधिवेशनात जनलोकपाल बिल पास न झाल्यास पुन्हा एकदा आंदोलन करण्याची तयारी अण्णा हजारे यांनी सुरू केली, पण त्याआधी जनलोकपाल संमत करण्याआधी आपणा भारतीयांची एकजूट किती आहे हे दाखविण्यासाठी अण्णा पुन्हा एकदा जंतरमंतरवर एक दिवसाचं धरणं आंदोलन करणार आहेत.