Last Updated: Monday, November 28, 2011, 08:22
झी २४ तास वेब टीम, राळेगणसिद्धी 
हिवाळी अधिवेशनात जनलोकपाल बिल पास न झाल्यास पुन्हा एकदा आंदोलन करण्याची तयारी अण्णा हजारे यांनी सुरू केली, पण त्याआधी जनलोकपाल संमत करण्याआधी आपणा भारतीयांची एकजूट किती आहे हे दाखविण्यासाठी अण्णा पुन्हा एकदा जंतरमंतरवर एक दिवसाचं धरण ं आंदोलन करणार आहेत.
अण्णा हजारेंनी जनलोकपालसाठी पुन्हा आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. अण्णा हजारेंच्या नेतृत्वाखाली भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन समिती ११ डिसेंबरला दिल्लीतल्या जंतरमंतर इथं धरणे धरणार आहे. अण्णांच्या वतीने टीम अण्णांचे सदस्य सुरेश पाठारे यांनी ट्विट केले आहे. हे धरणं आदोलन फक्त एक दिवसासाठी असणार आहे.
First Published: Monday, November 28, 2011, 08:22