अण्णांचे उपोषण, मैदान भाड्यात सूट नाही

Last Updated: Saturday, December 24, 2011, 08:48

एमएमआरडीए मैदानाच्या भाड्यात सूट देण्यासाठी महाराष्ट्र सरकारला सांगु शकत नसल्याचं मुंबई उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. इंडिया अगेनस्ट करप्शनशी संलग्न असलेल्या जागृती नागरिक मंचाने बांद्रा कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदान मोफत किंवा सवलतीच्या दराने मिळावं अशी याचिका दाखल केली होती. यासंबंधी निर्णय दिल्यास तो संसदेच्या कामात हस्तक्षपे ठरेल असं उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटलं आहे.