मोदी, सनी लिऑनच्या नावे जात प्रमाणपत्राची मागणी

Last Updated: Monday, May 5, 2014, 16:29

जात प्रमाणपत्राच्याबाबतीत एक धक्कादायक माहिती पुढे आली आहे. भाजपचे नेते आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि पॉर्नस्टार सनी लिओन यांच्या नावाने चक्क ऑनलाईन अर्ज उत्तर प्रदेश प्रशासनाकडे आला आहे. या अर्जाने अधिकाऱ्यांना धक्काच बसलाय. बनावट अर्जाबाबत चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.

नवनीत कौर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल

Last Updated: Thursday, March 13, 2014, 14:42

लोकसभा निवडणूक २०१४ साठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळालेल्या नवनीत कौर राणा यांच्यावर मुलुंड पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

जात प्रमाणपत्रासाठी ज्येष्ठ नागरिकांचे हाल!

Last Updated: Monday, July 22, 2013, 20:05

अनुसूचित जातीच्या सेवानिवृत्त कर्मचा-यांनी ३१ जुलै पर्यंत जात प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश सरकारनं दिलेत. कागदपत्रं सादर झाली नाही तर निवृत्ती वेतन बंद करण्याचा इशारा देण्यात आलाय.

जातीने केली माती, मनस्ताप आणि गोंधळ

Last Updated: Wednesday, July 17, 2013, 10:43

सरकारी नोकरीत असलेल्या प्रत्येकाला जात पडताळणी प्रमाणपत्राची सक्ती करण्यात आलीये. त्यातच धुळे जिल्ह्यातील जातपडताळणी कार्यालयातील अपुरी कर्मचारी संख्या आणि विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे जातपडताळणी कार्यालयात येणाऱ्या प्रत्येक अर्जदाराचा मनस्ताप होतोय.

मनसे महिला नगरसेवकाला दंड ठोठावलाय

Last Updated: Tuesday, April 23, 2013, 10:21

पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी खोटे जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी पत्र निवडणूक आयोगाला सादर केल्याप्रकरणी मनसेच्या नगरसेविका कल्पना बहीरट यांना न्यायालयाने २५ हजार रूपयांचा दंड ठोठावलाय. दंडाची ही रक्कम सहा आठवड्यांत राज्य निवडणूक आयोगाला देण्याचे आदेश न्यायालयाने दिलेत.

मुंबई महापालिकेत मनसेला धक्का

Last Updated: Thursday, March 14, 2013, 19:57

मुंबई महापालिकेतील मनसे नगरसेविका गीता बाळा चव्हाण वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत. त्यांचे नगरसेवक पद राहणार की जाणार याचीच चर्चा आता सुरू झाली आहे.