चेहऱ्यावर पिंपल्स... काळजी नको!

Last Updated: Wednesday, December 25, 2013, 20:57

मुख्यता तारुण्याच्या उंबरठय़ावर असताना यौनग्रंथी विशेषत्वाने सक्रिय होतात. यौन ग्रंथीतील अंतस्राव शरीराच्या विकासात महत्त्वपूर्ण ठरतात. मात्र या अंतस्रावात अँण्ड्रोजनची पातळी वाढल्यावर मुरुमं येतात. तसेच मासिक पाळी येण्यापूर्वी मुलींच्या शरीरात प्रोजेस्टेरॉनची पातळी वाढते, त्यामुळे चेहर्या वर, गालावर, नाकावर, कपाळावर तसेच खांदे, पाठीवर किंवा छातीवर मुरुमं येतात. ठरावीक वयात शरीरात होणारे बदल आपण टाळू शकत नाही; मात्र आपल्या आहार-विहारात काही बदल केल्यास आपण मुरुमांच्या त्रासाची तीव्रता कमी करू शकतो. कित्येकदा अयोग्य आणि अवेळी आहार मुरुमांना आमंत्रण ठरतो. मुरुमांचा त्रास असणार्यांयनी शरीरात उष्णता निर्माण करणारे पदार्थ टाळणं गरजेचं असतं. बदाम, आक्रोड तसेच मांसाहारासारखे गरम प्रकृतीचे पदार्थ टाळणंही आवश्यक असतं.

सावधान, तंबाखू, धूम्रपानामुळे ६० लाख लोकांचा मृत्यू

Last Updated: Thursday, July 11, 2013, 12:56

लोकांमध्ये कितीही जनजागृती होत असली तरीही जगभरात धूम्रपानामुळे मृत्यूंच्या संख्येत वाढ होत आहे.

धूम्रपानाला दूर ठेवायचंय... योगासनं करा!

Last Updated: Wednesday, April 3, 2013, 07:50

धूम्रपान सोडण्याची इच्छा असलेल्यांना एक हुकमी मार्ग उपलब्ध झाला आहे. तो म्हणजे योगासनं.

व्यसनांना घाला आळा, अग्नाशय कँसर टाळा...

Last Updated: Wednesday, October 3, 2012, 16:30

धूम्रपान आणि मद्यपान करणाऱ्यांना अग्नाशय कँसर होण्याचा धोका अधिक असतो. एका नव्या अभ्यासात ही गोष्ट समोर आली आहे. मिशिगन हेल्थ सिस्टम विश्वविद्यालयाच्या संशोधकांनी यासंदर्भात संशोधन केलंय.

धूम्रपानामुळे लवकर येतो मेनोपॉझ!

Last Updated: Thursday, November 17, 2011, 15:49

सिगरेट ओढण्यामुळे मेनोपॉझ एक वर्ष आधीच येऊ शकतो.सिगरेट पिण्यामुळे हाडांच्या आणि हृदयाच्या विकारांव्यतिरिक्त महिलांची मासिक पाळीही वेळेआधीच बंद होऊ शकते. असं मत डेली मेलने नोंदवलं आहे.