नक्षल हल्ला : २२ संशयितांची चौकशी सुरु

Last Updated: Wednesday, March 28, 2012, 09:47

गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. नक्षलवाद्यांनी CRPF जवानांच्या गाडीवर केलेल्या हल्ल्यात १२ जवान शहीद झालेत. तसंच २८ जवान जखमी झालेत. या घटनेनंतर 22 संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरु करण्यात आली आहे.

नक्षलवादी हल्ल्यात १२ जवान शहीद

Last Updated: Tuesday, March 27, 2012, 18:20

गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील पुश्तोळा गावाजवळ नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात सीआरपीएफचे १५ जवान ठार झाल्याची भीती व्यक्त होत आहे. आज सीआरपीएफचे जवान गस्त घालत असताना नक्षलवाद्यांनी हा हल्ला केला.