नगरसेवकाचं अपहरण झालचं नव्हतं....

Last Updated: Monday, February 20, 2012, 14:31

ठाणे महापालिकेच्या नगरसेवक अपहरणनाट्याचा पर्दाफाश झाला आहे. बसपचे नगरसेवक विलास कांबळे हेच पोलिसांसमोर हजर झाले आणि आपलं अपहरण झालं नसल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. त्यामुळं शिवसेना आमदार एकनाथ शिंदेंवरील गुन्हा मागे घेण्यात आला आहे.