नरेंद्र मोदी परदेशी नेत्यांशी हिंदीतून बोलणार

Last Updated: Wednesday, June 11, 2014, 12:23

लोकसभेत अनेक खासदारांनी आपल्या मातृभाषेत शपथ घेतली. सुषमा स्वराज, उमा भारती यांनी संस्कृतमधून तर महाराष्ट्रातील काही खासदारांनी मराठीतून शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिंदीतून शपथ घेतली. आता मोदी हे परदेशी नेत्यांशी हिंदीतूनच बोलणार आहेत. त्यासाठी ते इंग्रजी दुभाषिकाची मदत घेणार आहे.

पंतप्रधान मोदींच्या पहिल्याच भेटीत अंकिताची समस्या दूर

Last Updated: Tuesday, June 10, 2014, 09:31

गुजरातची टेनिसपटू अंकिता रैना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटली. पहिल्याच भेटीत तिची जी अडचण होती ती दूर झाल्याने अंकिता खूप खूश आहे. मोदींनी दिलेले आश्वासन पूर्ण केल्याने अंकिताचा पुढे खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

पंतप्रधान मोदी यांची गोपीनाथ मुंडेना श्रध्दांजली

Last Updated: Tuesday, June 3, 2014, 10:08

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त केला आहे. मुंडे यांना पंतप्रधान मोदी यांनी श्रध्दांजली वाहीली. मुंडेच्या निधनाने देशाचे मोठे नुकसान झालेय, असं मोदींनी ट्विटरद्वारे श्रध्दांजली वाहली.

मधुर भंडारकर बनवणार नरेंद्र मोदींवर चित्रपट!

Last Updated: Saturday, May 24, 2014, 18:43

देशाचे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदींची व्यक्तिरेखा लवकरच मोठ्या पडद्यावर धूम करतांना दिसेल. हो कारण आता प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक मधुर भंडारकर मोदींच्या आयुष्यावर चित्रपट बनवणार आहेत. एवढंच नव्हे तर या बाबतीत भंडारकरांनी मोदींची भेटही घेतलीय.