मोदी सरकारचं पहिलं बजेट 10 जुलैला

Last Updated: Monday, June 23, 2014, 20:51

नरेंद मोदी सरकारचं पहिलं बजेट 10 जुलैला सादर होणार आहे. तर रेल्वे बजेट 8 जुलैला संसदेत सादर केलं जाईल आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्याचं आर्थिक सर्वेक्षण करण्यात येईल. संसदेचं बजेट अधिवेशन हे 14 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. यावर राष्ट्रपतींच्या मंजूरीनंतरच तारखांची औपचारिक घोषणा केली जाईल.

लहान मुलांचं खातं उघडण्यात `एसबीआय`चं पहिलं पाऊलं

Last Updated: Friday, May 9, 2014, 11:28

लहान मुलांना बँकेत खातं उघडण्याची परवानगी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दिली आहे. रिझर्व्ह बँकेच्या परवानगीनंतर स्टेट बँक ऑफ इंडियाने लहान मुलांसाठी खातं उघडण्याचा श्रीगणेशा केला आहे.

पॉलिटेक्निक पहिल्या वर्षाचा गणिताचा पेपर फुटला, आजची परीक्षा रद्द

Last Updated: Saturday, November 23, 2013, 12:08

राज्यात पुन्हा एकदा पेपरफुटीमुळं विद्यार्थ्यांना फटका बसलाय. औरंगाबादमध्ये आज होणारा पॉलिटेक्निक पहिल्या वर्षाचा पहिल्या सेमिस्टरचा गणिताचा पेपर फुटलाय. यामुळं आज सकाळी होणारी परीक्षा रद्द करण्यात आली असून आता हा गणिताचा पेपर ४ डिसेंबरला घेतला जाणार आहे.

नील आर्मस्ट्रांग यांच्यावर ह्रद्य शस्त्रक्रिया

Last Updated: Thursday, August 9, 2012, 16:06

चंद्रावर पहिल्यांदा आपला पाय रोवणाऱ्या नील आर्मस्ट्रांग यांच्या ह्रद्यावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आलीय. 82 वर्षांचे नील आर्मस्ट्रांग हे शस्त्रक्रियेनंतर सध्या आराम करत आहेत.

भारताला पहिलं पदक, गगनने पटकावलं ब्राँन्झ

Last Updated: Monday, July 30, 2012, 17:37

भारताचाच नेमबाज गगन नारंग याने लंडन ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलंवहिलं पदक मिळवून दिलं आहे. १० मी. पुरूष एअर रायफल शूटींग स्पर्धेत गगन नारंगने तिसरे स्थान पटकावित कास्य पदकाला गवसणी घातली आहे.

मायकल क्लार्कचं पहिलं वहिलं त्रिशतक

Last Updated: Thursday, January 5, 2012, 09:25

ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन मायकल क्लार्कनं शानदार ट्रिपल सेंच्युरी ठोकली आहे. टेस्ट करिअरमधील त्याची ही पहिली-वहिली ट्रिपल सेंच्युरी ठोकली आहे.