सचिनच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला - गांगुली

Last Updated: Tuesday, August 20, 2013, 15:31

भारतीय क्रिकेट टीमचा माजी कप्तान सौरव गांगुलीनं मास्टर ब्लास्टर सचिनच्या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया दिलीय. खेळाडूंच्या निवडीबाबत सचिननं केलेल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला, असं सौरव गांगुलीचं म्हणणं आहे.

शाहरुखसाठी प्रियांका आली धावून

Last Updated: Wednesday, January 30, 2013, 11:33

मला भारतीय असल्याचा गर्व आहे आणि मला फुकटचे सल्ले नकोत, असं सांगत शाहरुखनं वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. याच शाहरुखसाठी त्याची अत्यंत जवळची मैत्रिण मानली जाणारी प्रियांका चोप्रा धावून आलीय.

पवारांकडून फौजिया खान यांची पाठराखण

Last Updated: Saturday, December 15, 2012, 18:23

दक्षिण आफ्रिकेतल्या सफारीत रक्तबंबाळ प्राण्यांसोबत फौजिया खान यांनी फोटो काढल्याचं उघड झाल्यानंतर विरोधक आणि वन्यजीव प्रेमींनी खान यांचा चांगलाच समाचार घेतला होता. पण, ही टीका चुकीची असून फौजिया खान यांनी काढलेल्या फोटोंमध्ये काहीही गैर नसल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना वाटतंय.

आबांनी केली जयंतरावांची 'आदर्श' पाठराखण

Last Updated: Sunday, July 1, 2012, 10:24

आदर्श घोटाळाप्रकरणी ग्रामविकासमंत्री जयंत पाटील यांना चौकशी आयोगानं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश देण्यात आलेत.. मात्र या घोटाळ्यात त्यांचा हात नसल्याचं सर्टिफिकेट देत गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी पाठराखण केलीय. तसंच मंत्रालयातल्या आगीत घातपात नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केले आहे.

राज ठाकरेंचं चुकलं कुठे? – अजित पवार

Last Updated: Tuesday, February 7, 2012, 16:28

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची पाठ राखण केली आहे. राज ठाकरे यांनी सभेसाठी शिवाजी पार्क मागितलं, तर त्यात चुकीचं काय, असं म्हणत अजित पवारांनी राज ठाकरेंच्या शिवाजी पार्कच्या मागणीला पाठिंबा दिला आहे.