नगरसेवकांनी काढली अधिकाऱ्याची अंत्ययात्रा!

Last Updated: Friday, November 30, 2012, 22:15

कोल्हापूरकर गेल्या अनेक वर्षात पाणी टंचाईला तोंड देत आहेत. त्यासाठी महापालिकेच्या वतीने मंत्रालयात थेट पाईप लाईन योजना सादर केली गेली. पण मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी या योजनेला विरोध केलाय. याचा निषेध म्हणुन महापालिकेच्या सर्व पक्षीय नगरसेवकांनी मंत्रालयातल्या अधिका-यांची अंत्ययात्रा काढली.

मराठवाड्याच्या पाण्यासाठी शिवसैनिकांचा हल्लाबोल

Last Updated: Monday, November 5, 2012, 20:24

मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न पुन्हा एकदा पेटण्याची चिन्ह आहेत. हक्काच्या पाण्यासाठी शिवसैनिकांनी पालकमंत्र्यांच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घुसण्याचा प्रयत्न केला. आणि पालकमंत्र्यांविरोधात घोषणा केली.

मुंबईतल्या आदिवासींसाठी चिखलाचं पाणी

Last Updated: Friday, May 11, 2012, 20:46

मुंबईतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील आदिवासी सध्या कोरडं आयुष्य जगत आहेत. कुठल्याही प्रकारची पाणी मिळण्याची साधनं उपलब्ध नसल्यामुळे मिळेल त्या पाणवठ्यावर चिखलाचं पाणी भरावं लागतं.

पाण्यासाठी पायपीट

Last Updated: Wednesday, May 9, 2012, 21:31

मुरबाड तालुक्यात पाणी पुरवठ्याच्या 178 योजना सात वर्षांपासून प्रलंबित आहेत. मात्र त्यातले जवळपास 90 टक्के पैसे ठेकेदारांनी वसूल केलेत. परिणामी अनेक गावं आज तहानलेली आहेत.

राष्ट्रपतींच्या सूनबाई करतायेत पाण्यासाठी वणवण

Last Updated: Sunday, April 15, 2012, 13:13

महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत असताना आता त्याच्या झळा खुद्द देशाच्या राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या माहेरगावालाही बसत आहे. जळगाव जिल्ह्यातल्या बोदवड तालुक्यातल्या नाडगाव या राष्ट्रपतीच्या गावात पाणीटंचाईनं भीषण रुप धारण केलं आहे.