मराठवाड्याच्या पाण्यासाठी शिवसैनिकांचा हल्लाबोल Shiv sena on water problem

मराठवाड्याच्या पाण्यासाठी शिवसैनिकांचा हल्लाबोल

मराठवाड्याच्या पाण्यासाठी शिवसैनिकांचा हल्लाबोल
www.24taas.com, मुंबई

मराठवाड्याचा पाण्याचा प्रश्न पुन्हा एकदा पेटण्याची चिन्ह आहेत. हक्काच्या पाण्यासाठी शिवसैनिकांनी पालकमंत्र्यांच्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घुसण्याचा प्रयत्न केला. आणि पालकमंत्र्यांविरोधात घोषणा केली.

मराठवाड्याच्या हक्काचं 27 टीएमसी पाणी मिळावं अशी मागणी यावेळी शिवसैनिकांनी केली. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार गोंधळ घातला. त्यावेळी पोलीस आणि शिवसैनिकांमध्ये धक्काबुक्कीही झाली. त्यात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांच्या डोक्याला मारही लागलाय.

शिवसैनिकांनी यावेळी पालकमंत्र्यांना पाणी प्रश्नावर निवेदनही दिलं. त्यावर पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांशी बोलण्याचं आश्वासन दिलंय. मात्र या गोंधळामुळे मराठवाड्याच्या पाण्याच्या प्रश्नावरून पुन्हा रणकंदन सुरू झालंय.

First Published: Monday, November 5, 2012, 20:24


comments powered by Disqus