Last Updated: Saturday, December 28, 2013, 16:05
डिसेंबरची गुलाबी थंडी ते मार्चचा उन्हाळा यामधील कालावधी म्हणजे स्थलांतरण करणार्यां पक्ष्यांचा पर्यटनकाळ. तर पक्षीप्रेमींसाठी आनंदाची पर्वणीच. जाणकारांच्या मते या दिवसांत पक्षी स्थलांतरण करतात. ते खाद्याच्या शोधात आणि प्रजननासाठी असेच काही पाहुणे भारतात दरवर्षी येतात. न चुकता काही वेळा शेकडोंच्या संख्येनं तर काही वेळा हजारोंच्या संख्येनंही येतात, पण येतात हे मात्र नक्की.