`मरा पण नेत्यांना मारुन मरा`, राज ठाकरेंचं वादग्रस्त विधान

Last Updated: Tuesday, April 8, 2014, 10:47

वीज, पाणी तसंच दळवळणाच्या सुविधा नसल्यानंच विदर्भातला शेतकरी देशोधडीला लागलाय, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी केलाय. आत्महत्या हा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरचं उत्तर नसून `मरा पण नेत्यांना मारुन मरा`, असं वादग्रस्त विधानही त्यांनी यावेळी केलं. ते यवतमाळमध्ये मनसे उमेदवार राजू पाटील यांच्या प्रचारसभेत बोलत होते.

राष्ट्रवादीचा असाही फंडा, सभेत प्रमुख वक्ता येईपर्यंत ऑर्केस्ट्रा

Last Updated: Sunday, April 6, 2014, 21:52

प्रचारसभेत मुख्य वक्ता येईपर्यंत गर्दीला खिळवून ठेवण्याची कसरत स्थानिक नेत्यांना करावी लागते. ही गर्दी कायम ठेवण्याची युक्ती पिंपरी चिंचव़डच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी शोधलीय. स्थानिक नेत्यांची रटाळ भाषणं ऐकवण्यापेक्षा श्रोत्यांचं मनोरंजन करण्याचा फंडा राष्ट्रवादीनं सुरु केलाय.

राज्यात दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभांचा धडाका

Last Updated: Friday, April 4, 2014, 12:30

राज्यात दिग्गज नेत्यांच्या प्रचारसभांचा धडाका आहे. नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरेंचा विदर्भात एल्गार तर राज ठाकरेंची तोफ नवी मुंबईत धडाडणार आहे.