Last Updated: Saturday, December 24, 2011, 09:35
ठाणे जिल्ह्यातील कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या वामन म्हात्रेंनी बाजी मारली आहे. अपक्ष नगरसेवक आशिष दामले उपनगराध्यक्षपदी निवडून आले आहेत. कुळगाव- बदलापूरमध्ये दोन वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा युती होऊ शकली नव्हती.