Last Updated: Wednesday, September 26, 2012, 11:07
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबासाहेब कुपेकर यांचे आज सकाळी निधन झाले. जसलोक रुग्णालयात आज त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे वय ७० होते. बाबासाहेब कुपेकरांनी यापूर्वी राज्यसभेचे सभापतीपदही भूषवले होते. गेल्या काही दिवसांपासून कुपेकर कर्करोगाने आजारी होते. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी आणि ३ मुली असा परिवार आहे.