गूड न्यूज: १५ ऑक्टोबरपासून मिळणार कायमचं पीएफ खातं

Last Updated: Monday, April 21, 2014, 17:50

कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटना म्हणजेच (ईपीएफओ)नं आपल्या सर्व सक्रिय खातेधारकांना १५ ऑक्टोबरपासून कायमचं पीएफ खातं क्रमांक देणार आहे. यूनिव्हर्सल अकाऊंट नंबर (यूएएन) नावानं मिळणारा हा खाते क्रमांक कोअर बँकिंग सेवेसारखी सेवा देईल. म्हणजेच हा नंबर मिळाल्यानंतर नोकरी बलणाऱ्या कर्मचाऱ्यांना आपला पीएफ अकाऊंट नंबर बदलण्याची किंवा ट्रान्सफर करण्यासाठी गरज नसेल.

`पीएफ` खातं होणार ऑनलाईन हस्तांतरीत

Last Updated: Monday, August 19, 2013, 08:57

भविष्यनिर्वाह निधीचं म्हणजेच पीएफ खात्याचं ऑनलाईन हस्तांतर करण्याची सुविधा पुढील आठवड्यापासून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नोकरी बदलणाऱ्या सुमारे 13 लाख ‘पीएफ` खातेधारकांना दरवर्षी या सेवेचा फायदा मिळणार असून, त्यामुळं अनेकांचा वेळ वाचणार आहे. ईपीएफओनं ऑनलाईन सेवेची यापूर्वीच यशस्वी चाचणी घेतली आहे.

संपूर्ण पगारावर कापला जाणार पीएफ

Last Updated: Tuesday, May 28, 2013, 20:13

बचतीच्या दृष्टीनं पाहिलं तर नोकरदार वर्गासाठी एक आनंदाची बातमी... येत्या काही दिवसांमध्ये तुमचा भविष्य निर्वाह निधी अर्थात पीएफ संपूर्ण पगारावर कापला जाणार आहे.

पीएफवर ८.६ टक्के व्याजदर

Last Updated: Friday, April 27, 2012, 15:52

नोकरी करणाऱ्यांसाठी एख खुश खबर आहे. पीएफवर ८.६ टक्के व्याजदर मिळणार आहे. २०१०-११ या आर्थिक वर्षात ईपीएफवर तब्बल ९.५ टक्के इतका व्याजदर दिला गेला होता. २०११-१२ मध्ये मात्र कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने तो थेट ८.२५ टक्क्यांवर आणला होता. त्यावर कर्मचारी संघटनांकडून मोठ्या प्रमाणात टीकाही झाली होती.