मुंबईसह उपनगरात पाऊस, लोकवर परिणाम

Last Updated: Sunday, June 9, 2013, 07:43

मुंबईसह उपनगरांत रात्रीपासून जोरदार पाऊस पडत आहे. आज रविवार असल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसला नाही. मात्र, शहरातील सकल भागात पाणी तुंबल्याने महापालिकेच्या स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे. ठाणे आणि नवीमुंबईत चांगला पाऊस पडत आहे. या पावसाचा परिणाम मुंबई लोकवर दिसून आलाय. मध्यरेल्वेच्या गाड्या उशिरा तर मध्य रेल्वेच्या गाड्या १० मिनिटे उशिराने धावत आहेत.

पाऊस ओसरला, पण चाकरमान्यांचे हाल सुरूच

Last Updated: Tuesday, September 4, 2012, 14:02

मुंबईत आता जरी पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. तरीही समुद्रातील भरती-ओहोटीकडे सगळ्यांचं लक्ष आहे. दुपारी 2 वाजून 12 मिनिटांनी भरती येणार आहे. या वेळी लाटांची सरासरी उंची 4.01 मीटर असेल, तर ओहोटी रात्री 8:16 मिनिटांनी असेल. मुंबई अहमदाबाद महामार्गावर दरड कोसळ्यानं वाहतूक ठप्प झालीय.

मुंबईत जोरदार पाऊस, रेल्वेवर परिणाम

Last Updated: Monday, September 3, 2012, 18:45

मुंबई आणि परिसरात जोरदार पाऊस कोसळतोय. पश्चिम उपनगरांमध्येही संततधार सुरू आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणारं तानसा धरण भरून वाहू लागलंय. सकाळपासूनच कोसळत असलेल्या सरींमुळे अनेक ठिकाणी पाणी साचलंय. तसंच मध्य रेल्वेच्या वाहतुकीवरही परिणाम झालाय.

मुंबईत पाऊस सुरूच, हाय टाईडचा धोका

Last Updated: Thursday, July 5, 2012, 10:09

मुंबई आणि परिसरात पावसाचा जोर कायम आहे. दादरच्या हिंदमाता परिसरात पाणी साचलं आहे. तसंच आज मुंबईच्या समुद्रात मोठी हाय टाईड असून लाटांची उंची ४.८३ मीटर्स असणार आहे. दुपारी १.३४ मिनिटांनी ही भरती असणार आहे.