नववर्षात पाईप गॅस महाग

Last Updated: Tuesday, December 25, 2012, 16:57

नव्या वर्षात मुंबईकरांना महागाईची भेट मिळणार आहे. नव्य़ा वर्षात मुंबईकरांना पाईप्ड गॅससाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. पाईप्ड गॅसचा पुरवठा करणाऱ्या महानगर गॅस लिमिटेड या कंपनीने पाईप्ड गॅसच्या किमतीमध्ये सव्वा आठ टक्क्यांनी वाढ केली आहे.