Last Updated: Tuesday, December 25, 2012, 16:57
www.24taas.com, मु्बईनव्या वर्षात मुंबईकरांना महागाईची भेट मिळणार आहे. नव्य़ा वर्षात मुंबईकरांना पाईप्ड गॅससाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. पाईप्ड गॅसचा पुरवठा करणाऱ्या महानगर गॅस लिमिटेड या कंपनीने पाईप्ड गॅसच्या किमतीमध्ये सव्वा आठ टक्क्यांनी वाढ केली आहे.
मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील ग्राहकांना आता गॅससाठी जास्त किंमत भरावी लागणार आहे. २१ डिसेंबर पासून नव्या दरांचं बिल सुरू करण्यात आलं आहे. मुंबईमधील साडे पाच लाखहून अधिक घरांमध्ये पाईप्ड गॅसचा पुरवठा होतो. यापूर्वी ऑक्टोबर २०११ मध्ये पाईप्ड गॅसच्या किमती वाढवल्या होत्या.
नवे दर ०.८० प्रति SCM-
ऑकटोबर २०११ डिसेंबर २०१२ वाढ % मध्ये
मुंबई रु. 20.24 21.90 8.20%
ठाणे रु. 20.39 22.07 8.24%
नवी मुंबई रु. 20.44 22.12 8.22%
मीरा भाईंदर रु. 20.49 22.18 8.25%
First Published: Tuesday, December 25, 2012, 16:37