मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊदचा मृत्यू

Last Updated: Friday, June 13, 2014, 09:52

1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद फणसेचा मृत्यू झालाय. जे. जे. रुग्णालयात मृत्यू झालाय. विशेष टाडा न्यायालयानं त्याला शिक्षा सुनावली होती. मुंबईत आरडीएक्स आणण्याची जबाबदारी दाऊद फणसेकडे होती. न्यायालयात त्यानं गुन्हा कबुल केला होता.