मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊदचा मृत्यू, Mumbai chain Bomb blast accused of the death of Dawood

मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊदचा मृत्यू

मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊदचा मृत्यू
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

1993 च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी दाऊद फणसेचा मृत्यू झालाय. जे. जे. रुग्णालयात मृत्यू झालाय. विशेष टाडा न्यायालयानं त्याला शिक्षा सुनावली होती. मुंबईत आरडीएक्स आणण्याची जबाबदारी दाऊद फणसेकडे होती. न्यायालयात त्यानं गुन्हा कबुल केला होता.

दाऊद फणसेचे वय ९० वर्षांपेक्षा जास्त होते. दाऊद फणसेला विशेष टाडा न्यायालयानं ९३च्या बाॅम्बस्फोटासाठी दोषी ठरवून शिक्षा आणि २ लाख रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली होती. ९३ च्या बाॅम्बस्फोटासाठी दाऊद फणसे, दाऊद इब्राहिम, टायगर मेमन आणि याकुब मेमन यांनी मिळून कट रचला होता.

रायगड जिल्ह्यातील शेकाडी समुद्र बंदरावरुन स्फोटासाठी लागणारं आरडीएक्स, १३ एके ५६ रायफल दाऊद फणसेनं मुंबईत आणले होते. शिवाय स्फोटासाठी लागणारं सगळं आरडीएक्स मुंबईत आणण्याची जबाबदार ही दाऊद फणसे याच्यावर होती. त्याआधी दाऊद फणसे आणि दाऊद इब्राहिम यांनी कट रचला होता. आणि हे सगळं दाऊद फणसेनं न्यायालयात क़बूल होतं.

त्यानुसार दाऊद फणसेला शिक्षा सुनावण्यात आली होती. पण, ९३ बाॅम्बस्फोटाचा खटला तब्बल १४ वर्षें चालला. त्यात दाऊद फणसेनं १३ वर्षें कारावास भोगला. त्याला शिक्षा सुनावण्या आधीचं त्याची प्रकृति बिघडल्यानं त्याला जे जे रुग्णालयात भरती केलं होतं.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, June 13, 2014, 07:46


comments powered by Disqus