बुलडाण्यातील ६६ वर्षीय आजीने जिंकली बारामती मॅरेथॉन

Last Updated: Monday, December 23, 2013, 19:37

बुलडाण्याची आधुनिक सावित्री. पती अंथरूणाला खिळून आहे. उपचारासाठी पैसे नाहीत. मोलमजुरी करून ती आपला उदरनिर्वाह चालवत आहे. त्यातच तिने आपल्या लाडक्या तिन्ही मुलींची लग्नही लावली. त्यामुळे गाठीला पैसे नाहीत. पती आजारातून उठला पाहिजे, या जिद्दीच्या जोरावर तिने बारामती मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेतला आणि ६६ वर्षीय आजीने पतीच्या प्रेमासाठी जीवाची बाजी लावत ही मॅरेथॉन जिंकलीही. प्रेमासाठी वाट्टेल ते, हे आजीने दाखवून दिलेय.

ठाण्यात रंगली ‘खड्डे’मय मॅरेथॉन!

Last Updated: Sunday, August 25, 2013, 15:31

२४व्या राज्यस्तरीय ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनवर पुण्याच्या आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूटचं वर्चस्व पाहायला मिळालं. पुरुषांमध्ये आलम सिंगनं १ तास, ७ मिनिटं आणि ३७ सेकंदांची वेळ नोंदवत २१ किलोमीटरमध्ये बाजी मारली. मात्र ही मॅरेथॉन खऱ्या अर्थानं रंगली ती रस्त्यावरील खड्ड्यांमुळं.