ठाण्यात दिवाळीतली संगीतमय सांस्कृतिक मेजवानी

Last Updated: Saturday, November 2, 2013, 10:34

राज्यात ठिकठिकाणी दिवाळी पहाटचे कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडले. दिवाळीतली ही संगीतमय सांस्कृतिक मेजवानी अनुभवायला नागरिक उत्सुक असतात. ठाण्यातही गडकरी रंगायतनमध्ये दिवाळी पहाटचा कार्यक्रम पार पडला.

पुण्यात काँग्रेस कार्यकर्त्यांना कांद्याची ‘मेजवानी’!

Last Updated: Wednesday, September 25, 2013, 14:44

पुण्यात सुरू असलेल्या राहुल गांधींच्या बैठकीत कांद्याचा सुकाळ पहायला मिळतोय. कार्यकर्त्यांना कांद्याची मेजवानी देण्यात येतेय. एकीकडे ७० ते ८० रुपयांच्या घरात गेलेला कांदा सर्वसामान्यांच्या डोळ्यातून पाणी काढतोय. काँग्रेससाठी मात्र कांद्याचा महापूर वाहतोय, असंच पुण्यातल्या या मेजवानीवरून दिसतंय.

युपीएची मेजवानी, प्रति थाळी रुपये ८ हजार!

Last Updated: Saturday, September 29, 2012, 14:02

`पैसे झाडाला लागत नाही`.. अशा शब्दांत महागाईचं समर्थन करणाऱ्या पंतप्रधानांनी स्वतः मात्र डिनर पार्टीवर 29 लाख रुपयांचा खर्च केल्याचं निदर्शनास आलं. या डिनर पार्टीत एकेका थाळीवर 8 हजार रुपये खर्च झाले असल्याचं सांगण्यात येत आहे.

दर्दी पुणेकरांना मराठी चित्रपट मेजवानी

Last Updated: Tuesday, July 31, 2012, 16:15

पुण्यातल्या चित्रपट रसिकांना पुढच्या महिन्यात अनोखी मेजवानी मिळणार आहे. दर्जेदार शंभर मराठी चित्रपट पुण्यातल्या थिएटर्समध्ये दाखवले जाणार आहेत. ११ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट दरम्यान हा चित्रपट महोत्सव सुरू राहणार आहे.

रावडी राठोडची मेजवानी प्रेक्षकांना

Last Updated: Friday, June 1, 2012, 13:04

या वीकेण्डला अक्षयकुमारच्या रावडी राठोडची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे .तसंच आम्ही का तिसरे हा वेगळ्या धाटणीचा सिनेमा असे तीन मराठी सिनेमेदेखील प्रदर्शित होत आहेत .