Last Updated: Wednesday, October 30, 2013, 13:38
मुंबई विरूद्ध हरयाणा रणजीचा सामन्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने शानदार अर्धशतक झळकावले. या अर्धशतकाच्या जोरावर मुबंईने आपला विजय साकार केला. तर सचिनचा हा शेवटचा रणजी सामना असल्याने त्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. सचिनने आपल्या चाहत्यांना निराश केले नाही तर आपल्या कामगिरीचा शेवटही चांगला केला. धवल कुलकर्णी यांने विजयी फटका मारल्यानंतर सहकाऱ्यांनी सचिनला खांद्यावर उटलून घेऊन मैदानाला फेरी मारून सचिनचे कौतुक केले.