रणजी ट्रॉफीमधून मुंबईचं आव्हान संपुष्टात, ranji trophy match mumbai loss

रणजी ट्रॉफीमधून मुंबईचं आव्हान संपुष्टात

रणजी ट्रॉफीमधून मुंबईचं आव्हान संपुष्टात
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

रणजी ट्रॉफीमधून मुंबईचं आव्हान संपुष्टात आलं आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्राकडून मुंबईला पराभवाचा धक्का बसला आहे. क्वार्टर फायनलमध्ये महाराष्ट्राने मुंबईला ८विकेट्सने पराभूत करत सेमी फायनलमध्ये धडक मारली. रणजी इतिहासातील महाराष्ट्राकडून मुंबईचा हा तिसरा पराभव ठरलाय.

तब्बल ४०वेळा रणजी ट्रॉफीवर नाव कोरणा-या मुंबईचं यंदाच्या सीझनमधील आव्हान संपुष्टात आल आहे. विशेष म्हणजे क्वार्टर फायनलमध्ये महाराष्ट्राकडून मुंबईला ८ विकेट्सने पराभवाला सामोर जाव लागल. चौथ्या दिवशी १ विकेट्स २८ रन्सच्या पुढे खेळताना महाराष्ट्राने २ विकेट्स गमावत २५२ रन्स करत रणजी ट्रॉफीच्या सेमी फायनलमध्ये धडक मारली.

महाराष्ट्रकडून केदार जाधवने शानदार सेंच्युरी झळकावली तर विजय झोलने ९१ रन्सची महत्त्वपूर्ण इनिंग खेळली. रणजी इतिहासामधील तिस-यांदा मुंबईचा महाराष्ट्राकडून पराभव झाला आहे. मुंबई पहिल्या आणि दुस-या इनिंगमध्ये अनुक्रमे ४०२ आणि १२९ रन्सवर ऑल आऊट झाली तर पहिल्या इनिंगमध्ये २८० रन्सवर ऑल आऊट झालेल्या महाराष्ट्राने दुस-या इनिंगमध्ये २ विकेट्स गमावत २५२ रन्स केल्या.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, January 11, 2014, 18:12


comments powered by Disqus