रूपया आणखी घसरला... १ डॉलर = ६८ रुपये!

Last Updated: Wednesday, August 28, 2013, 10:21

बाजार उघडताच एका डॉलरसाठी तब्बल ६७.४२ पैसे मोजावे लागत होते... त्यानंतर थोड्याच वेळात रुपयानं ६८ चा अंकही पार केलाय. हा रुपयांचा आत्तापर्यंत सर्वांत मोठा निचांक आहे.

रूपया घसरला : सोने ३० हजारी पार, बाजार गडगडला

Last Updated: Friday, August 16, 2013, 12:26

घसरणाऱ्या रुपयाला टेकू देण्यासाठी आणि वित्तीय तूट कमी करण्याच्या हेतूने केंद्र सरकारने सोने, चांदी आणि प्लॅटिन यांच्यावरील आयात शुल्क वाढविल्याने सोने दरात विक्रमी वाढ झाली आहे. आज सकाळी १०९४ रूपयांनी वाढ होऊन सोने ३०४१२ प्रति तोळा झाले आहे. तर आंतरराष्ट्रीय बाजारात रूपयाची घसरण झाली. डॉलरच्या तुलनेत रूपया ६२ रूपयांवर पोहोचला आहे. याचा परिणाम शेअर मार्केटवर झालाय. बाजार कोसळला आहे.