Last Updated: Friday, April 20, 2012, 13:43
मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी रेल्वेवाहतूक तिसऱ्या दिवशी रूळावर आली. मात्र, कुर्ला ते विद्याविहारदरम्यान ती धिम्या गतीने सुरू आहे. मंगळवारी रात्री कुर्ला येथील सिग्नल कंट्रोल रूमला आग लागल्याने सिग्नल यंत्रणेचे तीनतेरा वाजले आणि मध्य आणि हार्बरची रेल्वेसेवा खोळंबली. त्यामुळे मुंबईकर प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. आज तिसऱ्या दिवशी काहीप्रमाणात प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. ९५ टक्के रेल्वे वाहतूक पूर्वपदावर आली आहे.