शाही विवाह भोवला; महापौरांची पक्षातून हकालपट्टी!

Last Updated: Saturday, March 2, 2013, 16:07

सांगलीचे महापौर इद्रिस नायकवडी यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आलीय. पक्षाचे आदेश मानत नसल्यानं त्यांची हकालपट्टी केल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष दिनकर पाटील यांनी दिलीय.

सांगली महापौरांच्या घरावर आयकरचे छापे

Last Updated: Wednesday, February 20, 2013, 16:25

राज्यात दुष्काळ असताना राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शाही थाटात लग्नाचा बार उवून दिला. या थाट राष्ट्रवादीच्या मंत्र्याना आणि महापौरांना चांगलाच महागात पडलाय. तर एका कंत्राटदारालाही शाही विवाह अडचणीचा ठरलाय. या सर्वांवर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली.

शाही विवाह : आयकर विभागाचे चिपळूणमध्येही छापे

Last Updated: Tuesday, February 19, 2013, 09:55

नगरविकास राज्यमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री भास्कर जाधव यांनी मुलाचा आणि मुलीचा शाही विवाह सोहळा आता चौकशीच्या फेऱ्यात अडकलाय. चिपळूणमध्ये आयकर विभागानं सोमवारपासूनच चौकशी सुरू केलीय.

मनसे आमदाराच्या मुलाचा शाही विवाहसोहळा...

Last Updated: Tuesday, February 19, 2013, 11:05

शाही विवाह सोहळे महाराष्ट्रात चांगलेच रंगू लागले आहेत. कृषीमंत्री शरद पवार यांनी तंबी दिल्यानंतरही राष्ट्रवादीचे अनेक नेते शाही सोहळे करण्यातच मग्न आहेत.

पवारांचे आदेश धाब्यावर बसवून पुन्हा शाही विवाह

Last Updated: Monday, February 18, 2013, 14:04

राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांचे आदेश धाब्यावर बसवून पुन्हा एकदा शाही विवाह सोहळा पार पडला. हा विवाह सोहळा पश्चिम महाराष्ट्रात थाटात झाला. विवाहाचे महाभोजन देण्यात आले. दुष्काळात वऱ्हाडीमंडळींनी चांगलाच मटनावर ताव मारला.