श्रावण सोमवारी गंगा स्नानाची पर्वणी

Last Updated: Thursday, July 19, 2012, 17:55

कोकणातील राजापूर येथील प्रसिद्ध गंगेचे सुमारे एक वर्षांच्या खंडानंतर पुन्हा आगमन झाले. हा चमत्कार मानला जातो. मात्र भूकंपाचा दाखला दिला गेल्याने याबाबत चर्चा सुरू झाली. असे असले तरी गेल्या काही वर्षांचा विक्रम यावर्षी गंगा मोडण्याची शक्यता आहे. तसेच श्रावण महिन्यात गंगा राहिल्याने भाविकांना श्रावण सोमवारी गंगा स्नान करण्याची दुर्मिळ संधी मिळणार आहे.