शशी थरूर उवाच- स्वामी विवेकानंद करायचे मद्यपान!

Last Updated: Tuesday, September 17, 2013, 13:21

नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडणारे शशी थरूर यांनी पुन्हा एकदा आपल्या विधानानं नव्या वादाला तोंड फोडलंय. रामकृष्ण मिशनचे संस्थापक स्वामी विवेकानंद मद्यपान करत असल्याचं खळबळजनक वक्तव्य शशी थरूर यांनी केलं असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षानं केला आहे.

मोदींनी बघितला स्वामी विवेकानंदांवरील चित्रपट

Last Updated: Wednesday, August 7, 2013, 10:34

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित चित्रपटांचं गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासाठी आज विशेष स्क्रिनिंग करण्यात आलं. मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी आपल्या काही सहकाऱ्यांसह चित्रपट बघितला.

नितीन गडकरींना भाजपचा ठाम पाठिंबा

Last Updated: Wednesday, November 7, 2012, 16:23

भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर भाजप नितीन गडकरींच्या पाठिशी ठाम राहिला आहे. स्वामी विवेकानंद आणि कुख्यात डॉन दाऊद यांची तुलना केल्याने गडकरींवर जोरदार टीका झाली. याबाबत पक्षातील ज्येष्ठ नेते राम जेठमलानी यांनी राजीनाम्याची मागणी गेली. मात्र, गडकरींवरील सर्व आरोप चुकीचे आहेत, अशी भूमिका घेत भाजपच्या कोअर समितीच्या बैठकीत गडकरींना पाठिंबा देण्याचे शिक्कामोर्तब करण्यात आले.

विवेकानंद आणि दाऊदचा आयक्यू समान - गडकरी

Last Updated: Monday, November 5, 2012, 13:02

पूर्ती कंपनीच्या गुंतवणूकदारांवरुन झालेल्या आरोपांचा धुरळा खाली बसतो ना बसतो तोच नितीन ग़डकरी यांच्यावर आणखी एक वाद ओढावलाय. भोपाळमध्ये त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्वामी विवेकानंद आणि दाऊद इब्राहिम यांचा आयक्यू समान असल्याचं वक्तव्य नितीन गडकरी यांनी केलयं.