मोदींनी बघितला स्वामी विवेकानंदांवरील चित्रपट, Narendra Modi watch the movie `The light: Swami Vivekanand`

मोदींनी बघितला स्वामी विवेकानंदांवरील चित्रपट

मोदींनी बघितला स्वामी विवेकानंदांवरील चित्रपट
www.24tass.com , झी मीडिया, गांधीनगर

स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर आधारित चित्रपटांचं गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासाठी आज विशेष स्क्रिनिंग करण्यात आलं. मुख्यमंत्री नरेंद्र मोदींनी आपल्या काही सहकाऱ्यांसह चित्रपट बघितला.

‘द लाईट: स्वामी विवेकानंद’ हा चित्रपट येत्या २३ ऑगस्टला रिलीज होतोय. या चित्रपटाचं पहिलं स्क्रिनिंग मोदींसाठी करण्यात आलं. मोदी यांनी काही आमदार, भाजपचे नेते आणि सरकारी अधिकाऱ्यांसमेवत हा चित्रपट बघितला.

चित्रपट बघितल्यानंतर मोदींनी चित्रपट निर्मात्यांचं एक प्रेरणा देणार चित्रपट बनवला म्हणून अभिनंदनही केलं. यंदा देशभरात स्वामी विवेकानंद यांच्या १५०व्या जयंतीचा उत्सव साजरा करण्यात येतोय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, August 7, 2013, 10:34


comments powered by Disqus