सर्वात मोठा गणेश फेस्टिव्हल साजरा करा महाराष्ट्रातील नंबर १ न्यूज चॅनल सोबत. यंदा गणेश भक्तांच्या आनंदात आम्हीही होणार सामील. यासाठी झी २४ तासचे अनेक खास कार्यक्रम....
१) आपला गाव आपला गणपती
झी २४ तास महाराष्ट्रातील खेड्यापाड्यापासून शहरांपर्यंतच्या १०१ गावातील गणपतींचे दर्शन गणेश भक्तांना करून देणार आहे.
२)सेलिब्रिटी शॉपिंग
आपले आवडते कलाकार करणार गणपतीची शॉपिंग... करणार गणपतीचा नैवेद्य.... काय असणार गणपतीची आभूषणं
३) मंगलमूर्ती मोरया स्पर्धा
मंगलमूर्ती मोयरामध्ये महाराष्ट्रासह जगभरातील गणेशभक्तांना समावून घेणार आहे. यात घरगुती गणपती स्पर्धा, इको फ्रेंडली गणेश स्पर्धा आणि सार्वजनिक मंडळ स्पर्धांचा समावेश आहे.
४) सेलिब्रिटी गणेश
आपले आवडते कलाकार कशी करतात आपल्या घरात गणपतीची स्थापना.... कशी करतात आरती. याचे फोटो आणि व्हिडिओ आपल्या झी २४ तासवर दाखविण्यात येणार आहेत.
५) जगभरातील गणेशांचे दर्शन
महाराष्ट्र जगभरात गणेशोत्सव अत्यंत भावपूर्ण वातावरणात साजरा केला जातो. अशा काही देशातील गणेश भक्तांनी आपल्या घरात किंवा मंडळात बसविल्या गणपतींचे फोटो आणि व्हिडिओ आपल्या पाहायला मिळणार आहे.
६) सेलिब्रिटींच्या शुभेच्छा
गणेशोत्सवाच्या काळात गणेश भक्तांना आपल्या आवडत्या सेलिब्रिटी देतील गणेशोत्सवाच्या शुभेच्छा
७) गणेश विसर्जन LIVE
गणेश विसर्जनाच्या महाराष्ट्रातील विविध शहरांमधील गणेश भक्तांचा सागराचे दर्शन आपण पाहू शकतात