दहा देशातील गणपतीचे दर्शन मुंबईत

Last Updated: Tuesday, September 10, 2013, 13:38

लोढा फाउंडेशनच्या वतीनं एक गणेश महोत्सव भरवण्यात आला आहे. भरवण्यात आलेल्या मुंबई गणेश महोत्सवात दहा देशांतील गणरायांचे दर्शन भक्तांना घेता येणार आहे. कोट्यवधी रुपये खर्च करुन याठिकाणी गणेशभक्तांसाठी पालीचे मंदिर, हिमालयाची प्रतिकृती अशा अनेक गोष्टी उभारण्यात आल्या आहेत.

गणपती मिरवणुकीवरून सेना-राष्ट्रवादीत राडा, दगडफेक

Last Updated: Tuesday, September 10, 2013, 12:28

अहमदनगरमध्ये गणरायाच्या आगमानाच्या निमित्तानं काढण्यात आलेल्या मिरवणुकी दरम्यान राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. यावेळी जोरदार दगडफेक केली. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.

जेव्हा भुजबळ-सोमय्या येतात आमने-सामने!

Last Updated: Monday, September 9, 2013, 21:12

गणपती बाप्पा कधी काय चमत्कार घडवेल, याचा नेम नाही... विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांच्या विलेपार्ल्यातल्या घरीही असाच एक राजकीय चमत्कार बाप्पानं घडवला. एकमेकांवर आगपाखड करणारे छगन भुजबळ आणि किरीट सोमय्या एकत्रच आले नाही तर चक्क गळाभेट करतांना दिसले.

मुंबईतले मानाचे गणपती!

Last Updated: Monday, September 9, 2013, 19:26

गणेशोत्सव हा आता केवळ मुंबईकरांचा सण राहिलेला नाही, तर त्याला राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय वलय प्राप्त झालंय. सार्वजनिक मंडळांनी केलेली आरास, सजावट पाहण्यासाठी देशी-विदेशी पाहुण्यांची पावलंही मुंबईकडे वळतात. प्रभादेवीचा सिद्धीविनायक म्हणजे तमाम मुंबईकरांचं आराध्य दैवत. पण गणेशोत्सवाच्या काळात विविध सार्वजनिक मंडळांचे गणपती पाहण्यासाठी लांबच लांब रांगा लागतात.

गणेशोत्सवातून राजकीय हेतू साध्य!

Last Updated: Monday, September 9, 2013, 19:01

यंदाच्या गणेशोत्सावाला विशेष महत्व आहे. कारण २०१४ मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका... राजकीय पक्षांना आपला जनसंपर्क वाढविण्यासाठी गणेशोत्सवासारखी दुसरी चांगली संधी मिळणार नाही. त्यामुळंच सर्वच राजकीय पक्षांचं इच्छुक उमेदवार सध्या सार्वजनिक गणेश मंडळांना भरघोस आर्थिक मदत देतांना दिसतायत.

बाप्पाची लगबग, गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा

Last Updated: Monday, September 9, 2013, 08:15

सारा आसमंत बाप्पा मोरयाच्या जयघोषात न्हाऊन निघालाय. पुढील १० दिवस हा उत्साह वाढतच जाणार आहे. सा-यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा.

पुण्यातले मानाचे गणपती

Last Updated: Monday, September 9, 2013, 00:04

पुण्यनगरीमध्ये गणेशोत्सवाची धामधूम सुरू झालीये. सामान्य नागरिकांनी बाप्पाला घरी आणण्यासाठी आजपासूनच गर्दी केलीये. तर मंडळाचे कार्यकर्ते मिरवणुकीच्या तयारीत मग्न आहेत

दीडशे वर्षांची परंपरा, 'चोर गणपती' आले दारा!

Last Updated: Sunday, September 8, 2013, 14:03

श्री. गणपती पंचायतन संस्थानच्या सांगलीतील प्रसिद्ध गणपती मंदिरात बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन झालंय. दीडशे वर्षापासूनची पंरपरा असलेल्या या गणपतीला ‘चोर गणपती’ असं म्हटलं जातं.