पोलीस मारहाण : निलंबित आमदारांना पोलीस कोठडी, kshitij thakur, Ram kadam, police

पोलीस मारहाण : निलंबित आमदारांना पोलीस कोठडी

पोलीस मारहाण : निलंबित आमदारांना पोलीस कोठडी
www.24taas.com, मुंबई

सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी यांना मारहाण केल्याप्रकरणी निलंबित मनसेचे आमदार राम कदम आणि भारिपचे आमदार क्षितिज ठाकूर यांना आज किला कोर्टात हजर करण्यात आलेय. त्यांना २२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेय.

विधान भवनामध्ये सूर्यवंशी यांना १४ ते १५ आमदारांना मारहणा केली होती, असे सूर्यवंशी यांचे म्हणणे आहे. मारहाण झाल्याप्रकरणी मरिन ड्राईव्ह पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर क्राईम बॅंच पोलिसांनी काल दोघांना अटक करण्यासाठी हालचाली केल्या. मात्र, दोन्ही आमदार विधान सभेत असल्याने त्यांना अटक करता आली नव्हती. त्यानंतर राम कदम यांनी स्वत:हून अटक करून घेण्याचे जाहीर केले.


आज राम कदम, क्षितिज ठाकूर यांना यांना मुंबई क्राईम बॅंच पोलिसांनी अटक केली. त्यानंतर या दोन्ही आमदारांची जी टी रूग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांना किला कोर्टात हजर करण्यात आले होते. कोर्टाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

First Published: Thursday, March 21, 2013, 15:38


comments powered by Disqus