Last Updated: Thursday, March 21, 2013, 11:16
www.24taas.com, मुंबईवाहतूक शाखेचे एपीआय सचिन सूर्यवंशी यांना विधानभवनात झालेल्या मारहाण आमदार क्षितीज ठाकूर पोलिसांना शरण आले आहेत. आमदार क्षितीज ठाकूर हे क्राईम ब्राँचच्या ताब्यात आहेत.
पोलिसांना ते आज शरण आले आहेत. आमदारांसमोर शरणागतीसाठी तीन पर्याय ठेवण्य़ात आले होते. मुंबई पोलीस मुख्यालय, मरिन ड्राईव्ह पोलीस ठाणे, आणि कोर्ट असे तीन पर्याय त्यांच्यासमोर होते.
थोड्याच वेळात राम कदम खारमधल्या शिवराज हाईट्स या इमारतीतल्या घराबाहेर पडणार आहेत. एपीआय सचिन सुर्यवंशींना झालेल्या मारहाणप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी ते पोलिसांना शरण जाणार आहेत.
First Published: Thursday, March 21, 2013, 11:06