अफजल गुरुच्या फाशीवरुन राजकारण सुरु , Afzal Guru hanged,

अफजल गुरुच्या फाशीवरुन राजकारण सुरु

अफजल गुरुच्या फाशीवरुन राजकारण सुरु
www.24taas.com,नवी दिल्ली

अफजल गुरुच्या फाशीवरुन आता राजकारण सुरु झालंय. सुशीलकुमार शिंदेचं भगवा दहशतवादावर पडदा टाकण्यासाठी हा मुहूर्त साधल्याचा आरोप मुरली मनोहर जोशींनी आरोप केलाय. तर अफजलच्या फाशीनंतर देशात एका समाजाचा रोष टाळण्यासाठी शिंदेंचं विधान होतं का असा तर्क लढवला जातोय.

संसद हल्ल्याचा मास्टरमाइंड अफजल गुरुचा खेळ अखेर संपलाय... त्याला तिहार जेलमध्ये फासावर लटकलंय... सरकार म्हणतंय की फाशीचं राजकारण नको. असे म्हणणारे सूचना आणि प्रसारण मंत्री मनीष तिवारी काय म्हणालेत? (यूपीए सरकार ने राजनीतिक स्थिरता को सुनिश्चित किया है। सामाजिक सद्भाव और शांति सुनिश्चित की। गुजरात जैसे हालात नहीं होने दिए..जब भी हम राष्ट्रीय सुरक्षा पर फ़ैसले लेते हैं तो वोट की राजनीति को नज़र में रखकर नहीं लेते।)


अफजलच्या फाशीचं गुजरातपासून सुरु झालेलं हे राजकारण व्होटबँकेच्या रुपात दिसू लागताच भाजप नेता मुरली मनोहर जोशींनीही थेट हल्लाबोल केला. भगवा दहशतवादावर पडदा टाकण्यासाठी अफजलला फाशी देण्यात आलीय, असे जोशी म्हणाले.

फाशीनंतर सुरु झालेलं हे राजकारण आता सुरुच राहण्याची चिन्हं आहेत. फाशीचं स्वागत होत असलं तरी उशीर का झाला असा सवाल विरोधकांकडून उपस्थित करण्यात येतोय. या वर्षी देशात नऊ राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होतायत. मुलायसिंह यांनीही वेळेआधीच लोकसभा निवडणुकांची भविष्यवाणी केलीय. त्यामुळं आता अफजलच्या फाशीवरुन सुरु झालेलं हे व्होटबँकेचं राजकारण आता आणखी रंगणार असेच दिसत आहे.

First Published: Sunday, February 10, 2013, 11:20


comments powered by Disqus